भारतातील सर्वात मोठी बाईक टॅक्सी, रॅपिडो म्हणजेच रोजच्या प्रवासासाठी सर्वात वेगवान आणि सर्वात स्वस्त मार्ग आहे. रॅपिडो बाईक टॅक्सी भारतात आता 90+ शहरांत उपलब्ध आहे.
या अॅपवर, 10+ दशलक्ष समाधानी ग्राहक आणि 50+ दशलक्ष राईड्ससह, इंट्रा-सिटी प्रवासाचे स्वरूप रॅपिडो बदलत आहे आणि खिशाला परवडेल अशा भाड्यामध्ये अगदी शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी पुरवत आहे.
रॅपिडोने 2015 मध्ये आपले कार्य सुरु केले. भारतात सर्वात प्रथम बाईक टॅक्सी या संकल्पनेची सुरुवात देखील रॅपिडोनेच केली. गेल्या काही वर्षांत या देशातल्या "राईड-हेलिंग" उद्योगात हा स्टार्टअप एक प्रमुख खेळाडू म्हणून वर आला आहे. Ola आणि Uber सारख्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या उलट रॅपिडो पूर्णपणे दुचाकी टॅक्सी क्षेत्रावर आपले कार्य केंद्रित करत आहे, ज्यामुळे दुचाकी टॅक्सी क्षेत्रात रॅपिडो अग्रेसर ठरते.
सध्या रॅपिडोची 90+ शहरांमध्ये उपस्थिती आहे, ज्यात बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, NCR, लखनौ, जयपूर, चंदिगढ, विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुचिरापल्ली, इंदूर, गुवाहाटी, सूरत, पाटणा आणि रांची यांचा समावेश आहे.
रॅपिडो बाईक टॅक्सी अॅप आताच डाऊनलोड करा, आणि मग तुम्हाला कधीच बसच्या रांगेत वाट पाहत उभे राहावे लागणार नाही किंवा इतर कॅब बुकिंग अॅप्स आणि शेअर राईड्सच्या अव्वाच्या सव्वा किंमती भराव्या लागणार नाहीत. रॅपिडो अधिक वेगवान, सक्षम, स्वस्त आणि विश्वसनीय पर्याय देऊन प्रवासासाठी कॅब्सच्या पर्यायांमध्ये हैदराबाद किंवा बंगळुरू सारख्या शहरांमध्ये सर्वांत पुढे आहे.
रॅपिडो बाईक टॅक्सी ट्रॅफिकची दाटी कमी करण्यात सुद्धा साहाय्य करते आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांना प्रवासाचा एक अधिक चांगला पर्याय पुरवते. इतर कॅब बुकिंग अॅप्सच्या तुलनेत, रॅपिडो हे भारतीय रस्त्यांसाठी सर्वात जास्त कार्यक्षम बुकिंग अॅप आहे. उपलब्ध असलेल्या इतर ऑनलाईन बुकिंग पर्यायांच्या तुलनेत बाईक्स हा रोजच्या प्रवासासाठी, साहजिकच खूप परवडण्याजोगा आणि स्वस्त पर्याय आहे.
रॅपिडो बाईक टॅक्सीची मुख्य वैशिष्ट्ये
व्हर्नाक्युलर अॅप - अधिक सोप्या आणि आरामदायक अनुभवासाठी अॅप तुमच्या भाषेत उपलब्ध आहे. सध्या रॅपिडो बाईक टॅक्सी अॅप इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
वन-क्लिक लॉगिन - बाईक बुकिंगसाठी 'ओटीपी'ची वाट पाहण्याची गरज नाही. वापरकर्त्यांना सहजतेने ऑनबोर्डिंग करता यावे म्हणून रॅपिडो एक-क्लिक लॉगिनचा उपयोग करते, ज्याने क्षणार्धात नोंदणी होते.
वारंवार भेट दिलेली स्थळे “Favourites” च्या स्वरूपात पुढच्या वेळी सहज उपलब्ध व्हावीत म्हणून सेव्ह करता येतात.
राईडचे वास्तविक वेळेतले स्थान जाणून घेण्यासाठी "लाईव्ह ट्रॅकिंग" चा उपयोग करता येतो.
विमा उतरवलेली आणि सुरक्षित बाईक राईड
रॅपिडोमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो. प्रत्येक वापरकर्त्याला संरक्षण मिळावे म्हणून, प्रत्येक रॅपिडो राईडचा कुठल्याही अतिरिक्त किंमतीविना 'अॅको इन्शोरन्स'सह विमा उतरवला जातो. त्याशिवाय आम्ही हेल्मेट आणि एक डिस्पोझेबल टोपी देतो, जेणेकरून स्वच्छतेविषयी चिंता न करता तुम्हाला बाईक टॅक्सीच्या राईडचा आनंद घेता यावा. बाऊंस आणि वोगो सारख्या सेल्फ-ड्राइव्ह स्कूटर रेंटल पर्यायांच्या उलट, रॅपिडो सुरक्षेविषयी सर्व प्रकारची काळजी घेऊन तुम्हाला एक अत्यंत आरामदायक "पिलियन राईड" देते.
सोपे ऑनलाईन बुकिंग अॅप
रॅपिडो बाईक टॅक्सी अॅपने राईड बुक करणे हे इतर कोणत्याही स्कूटर रेंटल्स, ऑनलाईन टॅक्सी किंवा कॅब अॅप्सच्या तुलनेत अधिक सोयीचे आहे. Android आणि iOS प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेल्या आमच्या वापरकर्त्यांसाठी सोयीच्या अशा अॅप्लिकेशनसह, 'रॅपिडो' नेहमीच तुमचे गो-टू बाईक बुकिंग अॅप राहील.
रॅपिडो बाईक टॅक्सी अॅप ओपन करा
GPS ने अॅप तुमचे पिकअपचे स्थान निवडते, जे तुम्ही मॅन्युअल पद्धतीने सुद्धा बदलू शकता
तुम्ही तुमचे पोहोचण्याचे अंतिम स्थान त्यात प्रविष्ट करू शकता किंवा मग ते स्थान निवडण्यासाठी तुम्ही नकाशावर एक पिनसुद्धा सोडू शकता.
हे झाल्यावर, अंदाजे भाडे स्क्रीनवर दाखवले जाईल
त्यांनतर, तुम्ही ऑनलाईन बुकिंग confirm करण्याची रॅपिडोला विनंती करू शकता
पेमेंटच्या सोप्या पद्धती
"रॅपिडो बाईक टॅक्सी" ग्राहकांना डिजिटल होण्यास प्रोत्साहन देत असले आणि कॅशलेस होण्यासाठी अनेक पर्याय पुरवत असले तरी ज्या ग्राहकांना कॅश बाळगणे सोपे वाटते त्या ग्राहकांना कॅश पेमेंट करण्याचा पर्यायसुद्धा खुला आहे. इतर डिजिटल पर्याय जे तुम्ही निवडू शकता ते आहेत वॉलेट सिस्टम्स जसे की PayTM, GPay आणि रॅपिडो वॉलेट.